भुसावळात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानेही भरला अर्ज

भुसावळ : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.सुनील सुरवाडे यांनीही शुक्रवारी कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. रेल्वे स्थानकाजवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचार रॅली काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, सुदाम सोनवणे, तालुकाध्यक्ष रूपेश साळुंखे, जिल्हा सचिव संजय सुरळकर, शहराध्यक्ष गणेश जाधव, तालुका सचिव गणेश इंगळे, जिल्हा सचिव विद्यासागर खरात व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

