हे पैसे मला मोदींनी पाठवलेत : बँक खात्यात चुकून आलेले साडेपाच लाख परत न देणार्‍या शिक्षकाला अटक


नवी दिल्ली : बँकेच्या चुकीमुळे शिक्षक असलेल्या ग्राहकाच्या खात्यावर चुकून साडेपाच लाखांची रक्कम आली. बँकेने संबंधित ग्राहकास रक्कम परत करण्यास सांगितल्यानंतर शिक्षकाने नकार देत ही रक्कम आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवल्याचा दावा केला. मात्र मानसी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणार्‍या बख्तियार गावात राहणार्‍या दास यांनी हे पैसे परत करण्यास नकार दिला. बँकेने अनेकदा नोटीस पाठवूनही दास यांनी हे पैसे परत देण्यास नका दिला तसेच दास यांनी बँकेच्या अधिकार्‍यांना आपण हे सर्व पैसे खर्च केल्याचंही सांगितलं. यानंतर बँकेने पावले उचलल्यानंतर बिहार पोलिसांनी खागरीया जिल्ह्यामधून 30 शिक्षकाला अटक केली.

मोदींनी पैसे पाठवल्याचा समज
गतवर्षी मार्च महिन्यामध्ये रणजीत दास यांच्या दक्षिण बिहार ग्रामीण बँकेतील खात्यावर साडेपाच लाख रुपये जमा करण्यात आले. मात्र नंतर बँक अधिकार्‍यांना ही रक्कम चुकून या व्यक्तीच्या खात्यावर जमा झाल्याचं समजलं. बँकेने दास यांच्याशी संपर्क साधला आणि पैसे तातडीने बँकेला परत करण्यासंदर्भात मागणी केली. जेव्हा माझ्या मोबाईलवर बँक खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज आला तेव्हा मला फार आनंद झाला. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हा फार जास्त पैसा आहे. मला वाटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पैसे मला पाठवले आहेत, असं दास यांनी चौकशीदरम्यान अधिकार्‍यांना सांगितल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !