लग्न न झाल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या
नवी दिल्ली : लग्न करणं शक्य नसल्याने प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. राजस्थानच्या डूंगरपूरमध्ये ही घटना घडली. प्रेमी युगुलाने एकाच ओढणीने कंबरेला बांधून आणि नंतर झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवले. राजस्थानमधील डुंगरपूरमध्ये राहणार्या प्रवीणचं रीना या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. मात्र त्यांच्या प्रेमप्रकरणात मोठा अडथळा निर्माण झाला होता. दोघांना एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा असताना घरच्यांचा विरोध असल्यामुळे ते लग्न करू शकत नव्हते. त्यामुळेच शेवटी निराश झालेल्या दोघांनी अखेर एकत्र फाशी घेऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घरापासून काही अंतरावर असणार्या रस्त्यावरील झाडाला लटकून गळफास घेतला. या घटनेने एकच खळबळ उडाली.