यावलमध्ये दोघांना रॉडने मारहाण
यावल : शहरातील कैकाडी वाडा येथे काहीही कारण नसताना एकाने दोन जणांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहाब खान अयास खान (22, रा.काझीपुरा यावल) आणि शेख फरीद शेख शरीफ (14, रा.राखिनीपुरा, यावल) हे दोघे 12 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास कैकाडी वाडा परीसरात फिर असताना दिलीप उर्फ बापू अशोक बारी (44, रा.संभाजी पेठ) याने काहीही कारण नसताना लोखंडी रॉडने दोघांना मारण्यास सुरूवात केली. यात शहाब याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी शहाब खान यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दिलीप बारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस. पठाण करीत आहेत.

