करंजीत शेतकऱ्याच्या घरात चोरी ; सव्वा लाखाचा ऐवज लंपास


पारोळा : पारोळा तालुक्यातील करंजी येथील कापूस वेचणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम व सोन्याची दागिणे असा एकूण सव्वा लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम लक्ष्‍मण पाटील हे शेतकरी आपला कुटुंबीयांसह आज सकाळी आठ वाजता त्यांच्या शेतातील कापूस वेचणी साठी गेले होते तर मुलगा हा शाळेत गेला होता. सकाळी दहा वाजता मुलगा शाळेतून घरी परतला व तो देखील घराला कुलूप लावून खिडकी चावी ठेवून शेतात कापूस वेचण्यासाठी आला. त्यानंतर तो पुन्हा साडे दहा अकरा वाजेच्या सुमारास घरी परत आला तर त्याला घराचा दरवाजा हा उघडा दिसला व घरातील सामान कपडे, साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्याने वडिलांना ही माहिती दिले. कुटुंब हे घरी पोहोचल्यानंतर त्यांनी गोदरेज कपाटाकडे धाव घेतली. कपाटाचे लॉक तोडून अनोळखी चोरट्याने एक लाख 22 हजार 697 रुपये किमतीचे सोण्याचे दागिने व दोन हजार रुपये रोख असा जवळपास सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय रवींद्र बागुल करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !