लासगावच्या शेतकर्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
पाचोरा : लासगावच्या शेतकर्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. पत्नीस पाण्याची तहाण लागल्याने शेतकरी विहिरीत पाणी काढण्यासाठी गेल्याने ही दुर्दैवी घटना घडली. कैलास सखाराम महाजन असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
शेतकर्याच्या मृत्यूने हळहळ
शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे व विहिीर कच्ची असल्याने शेतकर्याचा पाय घसरला व तो विहिरीत पडला. विहिरीत 20 ते 25 फूट पाणी असल्याने शेतकर्याचा बुडाल्याने मृत्यू झाला. विहीर ही भेंडीच्या शेतापासुन जवळच असल्याने त्याचे पत्नीस विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने तिने धाव घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पत्नीने गावातील नागरीकांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती कळविली मात्र गावातील नागरीक घटनास्थळी पोहचे पर्यंत शेतकर्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित साळुंखे यांनी केले. मयत शेतकर्याच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी व तीन मुली आहेत. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामदास चौधरी हे करीत आहेत.

