दुचाकीला धडक देत तरुणीचा मोबाईल लांबवला : त्रिकूट जिल्हा पेठ पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : गणेश कॉलनीत रस्त्याने पायी चालत असलेल्या तरुणीला समोरुन दुचाकीची धडक देऊन तिचा मोबाईल लांबविणार्‍या तीन संशयितांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. नितेश मिलिंद जाधव (22), विशाल रवींद्र धनगर (22) व प्रवीण गोकुळ कोळी (23, तिघे रा.पिंप्राळा) अशी तिघा संशयीतांची नावे आहेत.

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल
पूजा दिलीप भावसार (28, रा.विजय कॉलनी) ही तरुणी रविवार, 17 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता घरातून कामानिमित्ताने गणेश कॉलनीत आली होती. त्यावेळी समोरुन दुचाकी (एम.एच.19 डी.के. 1386) या क्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या तरुणाने पूजाला धडक दिली. त्यात तरुणीच्या हातातील मोबाईल खाली पडला. त्यानंतर संशयितांनी मोबाईल उचलून नेत पोलिसांकडे तक्रार दिली तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिले. तिघेही पसार झाले होते. याप्रकरणी जखमी तरुणीच्या तक्रारीवरुन तरुणांविरुध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने दुचाकी क्रमांकावरुन मालकाचा शोध घेऊन तिघा संशयीतांना मंगळवारी पहाटे ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !