पित्यासह भावाला कोंडले : पाच नराधमांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
भरतपूर : अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी अत्याचर केला. राजस्थानातील भरतपूरमध्येही घटना घडली. एका गावातील व्यक्तीने गावातीलच 5 जणांविरोधात सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली. पाचही जणांनी दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या मुलाला घरात कोंडले आणि मुलीवर अत्याचार केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांनी त्यांच्या 9 बीघा शेतातील पीकही पेट्रोल टाकून पेटवून दिले आहे.
पित्यासह भावाला कोंडत केला अत्याचार
यासंदर्भात बोलताना तपास अधिकारी अनिल मीना म्हणाले, एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील 5 बदमाशांनी त्याच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यासह त्यांच्या 9 बिघा शेतातील पिकालाही आग लावली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याच बोरब, पूर्वीही या दोन्ही बाजूंच्या लोकांत भांडणे आणि झजउडज अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते.

