संतापात घर सोडलेल्या विवाहितेवर गँगरेप


पाटणा : पतीसोबत झालेल्या वादानंतर विवाहितेने घर सोडले मात्र नराधमांनी विवाहितेवर सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पटनामध्ये उघडकीस आली. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी पतीसोबत झालेल्या वादानंतर विवाहिता घर सोडून गेली. कोलकाताला जाण्याचा निर्णय तिने घेतला आणि ट्रेन पकडण्यासाठी पाटणा जंक्शन गाठले. यानंतर ती महिला एका हॉटेलमध्ये गेली, जिथे तिने हॉटेल मालकाला कोलकाताला जाणार्‍या ट्रेनबद्दल विचारले. हॉटेलचा मालक गोपाल याने त्याचा मित्र अमितला त्या महिलेबद्दल सांगितले आणि दोघे तिला अजय नावाच्या दुसर्‍या व्यक्तीकडे घेऊन गेले, ज्याने करबीघिया भागात खोलीची व्यवस्था केली, जिथे त्याने तिला ट्रेन येईपर्यंत थांबायला सांगितले.

चोवीस तास नजकैदेत ठेवले
काही तासांनंतर तिन्ही आरोपींनी खोलीत जाऊन तिचे लैंगिक शोषण केले, असे अधिकार्‍याने सांगितले. आणखी दोन ऑटोचालकही या गुन्ह्यात सामील झाले. पीडितेला 17 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत त्याच खोलीत बंदिस्त ठेवण्यात आले होते. एक आरोपी तिच्यावर नजर ठेवण्यासाठी चोवीस तास खोलीच्या बाहेर राहायचा. पीडित महिला कोलकाताला पोहचली नाही, तेव्हा तिच्या पतीने जक्कनपूर पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली. तिचा मोबाईल सर्विलन्सवर ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये पाटणा जंक्शन हे तिचे शेवटचे स्थान असल्याचे आढळले. या अंतर्गत शोधमोहीम सुरू करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस महिलेला ज्या घरात डांबून ठेवले होते तिथे पोहचत या महिलेची सुटका केली आणि एक आरोपी गोलू याला अटक करण्यात आली. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपी गोपाल कुमार, अमित कुमार, अजय कुमार आणि अरुण यांनाही अटक करण्यात आली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !