जळगावात पान टपरी चालकाची आत्महत्या


जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील पानटपरी चालकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. पूनमचंद श्रावण बारी (40) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसलेतरी नुकतीच बारी यांची पानटपरी मालवाहू वाहनाच्या धडकेत उद्ध्वस्त झाल्याने त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे? अशी चर्चा आहे.

नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
गुरुवार, 14 ऑक्टोबर रोजी रात्री दोन वाजता एका मालवाहू पीकअपने बारी यांच्या पानटपरीला धडक दिल्याने पानटपरी जमीनदोस्त झाल्यामुळे ते तणावात होते. पानटपरीची नुकसान भरपाई देतो, असे मालवाहू पीकअप वाहन मालकाने आधी सांगितले मात्र नंतर भरपाई देण्यास नकार दिल्याने बारी यांना नैराश्य आल्याची चर्चा आहे तर पिकअप वाहन मालकावर जळगाव एमआयडीसी पोलिसात टपरीला धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. डोक्यावर झालेले कर्ज कसे फेडावे ? या विवंचनेत बारी यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. बारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण, आई, वडील असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !