किचन ट्रॉलीचे काम न करता फसवणूक : एकाविरोधात गुन्हा
जळगाव : शहरातील खंडेराव नगरात राहणार्या गृहिणीकडून पैसे घेवून देखील किचन ट्रॉलीचे काम न करता कामगाराने 80 हजार रूपये घेवून फसवणूक केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कलाबाई नारायण शिरसाठ (वय 40, रा. खंडेरावनगर) यांच्या घरी किचन ट्रॉलीचे काम करायचे असल्याने त्यांनी जितेंद्र सुरेश भावसार (रा.अयोध्यानगर) याला 16 जुलै 2021 रोजी 80 हजार रुपये दिले. परंतू कामगार भावसार याने प्रत्यक्ष कामास सुरूवात केली नाही. कलाबाई यांनी वेळोवेळी विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर कलाबाई यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भावसार याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास हवालदार विजय पाटील करीत आहेत.
