ग्रामीण भागाची जीवनवाहिनी थांबली : चाळीसगावात विविध मागण्यांसाठी एस.टी. कर्मचार्‍यांचे बेमुदत आंदोलन!


चाळीसगाव : विविध प्रलंबित मागण्या ह्या तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी संयुक्त कृती समितीतर्फे एस.टी. कर्मचार्‍यांकडून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन आजपासून पुकारण्यात आले आहे. याचे पडसाद चाळीसगाव येथील आगारात ही उमटले. कोरोनाच्या काळात स्वतः चा जीव धोक्यात घालून राज्य परीवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य पार पाडले. कडकडीत टाळेबंदीत कर्मचार्‍यांनी परीवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करून दिला. असे असताना गेल्या अनेक दिवसांपासून एस.टी. कर्मचार्‍यांच्या मागण्या ह्या प्रलंबीतच आहे. यामुळे विविध मागण्या ह्या राज्य सरकारने तातडीने पूर्ण कराव्यात यासाठी संयुक्त कृती समितीतर्फे एस.टी. कर्मचार्‍यांकडून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून चाळीसगाव परीवहन महामंडळाच्या एस.टी. कर्मचार्‍यांकडून बेमुदत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन
दरम्यान महाराष्ट्र शासनात विलिनीकरण, वार्षीक वेतनात 3 टक्के वाढ, घर भाडे मान्य केल्याप्रमाणे लागू करावे, राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता 28 टक्के लागू करण्यात यावे, नियमानुसार अग्रीम रक्कम 12,500 द्यावे व दिवाळीच्या अगोदर दिवाळी भत्ता 15,000 हजार रुपये आदी मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी संयुक्त कृती समितीचे विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो अशा विविध घोषणाबाजीने परीसर दणाणून गेला. दरम्यान, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले. याप्रसंगी कामगार संघटना सचिव विनोद पाटील, कामगार सेना सचिव सुनील जाधव, उदय सोनवणे, चालक विजय शर्मा, किशोर पाटील, मुस्ताक शेख, नितीन चव्हाण, सुरेश कुमावत, पप्पू कोळी व मोठ्या संख्येने एस.टी. कर्मचारी उपस्थित होते.

भुसावळ पालिकेच्या सभागृहात 48 ऐवजी दिसणार 56 नगरसेवक ! 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !