अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती : दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तरुणी गर्भवती राहिल्याने या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघा आरोपींच्या एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. तुषार पुरुषोत्तम पवार (19, कसबे वणी, ता.दिंडोरी, जि.नाशिक) व सचिन संजय मराडे (23, खंबाळे, ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक) अशी अटकेतील तरुणांची नावे आहेत.
अत्याचारातून पीडीता गर्भवती
19 जुलै रोजी दुपारच्या वेळी अल्पवयीन मुलीस तुषार पवार याने पळवून नेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याने तरुणी गर्भवती राहिली. तरुणीला पळवून नेण्याकामी तुषारचा मित्र सचिन मराडे याने मदत केली होती. या प्रकरणी सुरुवातीला एमआयडीसी पोलिस स्टेशनला पीडितेला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपासाअंती पीडितेवर अत्याचार व त्यातून ती गर्भवती झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम (4), (5), (एल), (6), 17 आदी कलम वाढवण्यात आले.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
या गुह्याच्या तपासकामी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहा.फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंढे, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, मुकेश पाटील, तुषार गिरासे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
