जळगावात दुचाकी चोरटा शहर पोलिसांच्या जाळ्यात
शनिपेठ परीसरातून चोरलेली दुचाकी जप्त
जळगाव : शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक करुणासागर जाधव आणि पोलीस नाईक गजानन बडगुजर हे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांनी शाहूनगर परीसरातून एकाला बुधवार, 24 नोव्हेंबर रोजी चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. चोरट्याला दुचाकीसह पुढील कारवाईसाठी गुरूवार 25 नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
शनीपेठ भागातून चोरली दुचाकी
शनिपेठ परिसरात असलेल्या इस्लामपुरा भागात राहणारे शेख समीनूर यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम.एच.19 ए.यु.0228 ही दुचाकी मंगळवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घराजवळूनच चोरी झाली होती. बुधवार 24 रोजी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस नाईक करुणासागर जाधव आणि पोलीस नाईक गजानन बडगुजर हे गस्तीवर होते. रात्री 11.30 च्या सुमारास शाहूनगर परीरसर गस्तीवर असताना त्यांना एक तरुण दुचाकीसह फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला थांबवत कागदपत्रांची मागणी केली असता त्याने ती दाखवली नाही. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ठोस विचारपूस केली असता दुचाकी मंगळवार, 23 रोजी शनिपेठ परीसरातून चोरी झाल्याचे समोर आले. शहर पोलिसांनी दुचाकीसह संशयीत नूर खान (23, रा.शाहूनगर) याला दुचाकीसह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

