सहाव्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाच्या लोगोचे प्रकाशन
चाळीसगाव : संविधान दिनानिमित्त नियोजित सहाव्या आदिवासी साहित्य संमेलन 2022 च्या लोगोचे प्रकाशन ज्येष्ठ आदिवासी साहित्यीक वहारूदादा सोनवणे व आदिवासी सांकृतिक महासंमेलन झाबुआचे 2021 चे अध्यक्ष विद्रोही कवी आदिवासी साहित्यीक भीमसिंग दादा पवार यांच्या हस्ते चाळीसगावातील शासकीय विश्राम गृहात करण्यात आले. यावेळी आदिवासी साहित्य संमेलनाचे लोगो रेखाटन करणारे चित्रकार कवी दिनेश चव्हाण व आदिवासी साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुनील गायकवाड उपस्थित होते. आजपर्यंत झालेल्या पाचही आदिवासी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे लोगो चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनीच आपल्या कलेतून तयार केले आहेत.
