जळगाव शहरातून पुन्हा दुचाकीची चोरी : रॅकेट सक्रिय
जळगाव : शहरातील रींगरोड परीसरातील चिल्ड्रन हॉस्पिटलच्या पार्किंगमधून तरुणाची 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात सातत्याने दुचाकी चोरीचे सत्र सुरू असल्याने या प्रकारामागे मोठी टोळी सक्रिय असल्याची दाट शक्यता आहे. जिल्हा पोलीस प्रशासनासह स्थानिक गुन्हे शाखेने दखल घेण्याची अपेक्षा वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे.
पार्किंगमधून लांबवली दुचाकी
विशाल लक्ष्मण सोनार (21, रा.अयोध्या नगर, जळगाव) हा तरूण रींगरोडवरील चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये कामाच्या निमित्ताने 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता दुचाकी (एम.एच. 19 बी.एच.6949) ने आले. त्यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आपली दुचाकी लावली होती. वैयक्तिक काम आटोपून बुधवारी सकाळी 11 वाजता दुचाकीजवळ गेले असता दुचाकी आढळून आली नाही. परीसरात शोधाशोध करूनही दुचाकी मिळाली नसल्याने शनिवारख 27 नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिल्यावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक भरत चव्हाण करीत आहे.

