भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकल्या : युवकासह दोघे जागीच ठार

पाचोरा भडगाव रस्त्यावर अपघात : तीन जण जखमी


पाचोरा : लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच तरुणाचा दुचाकी अपघाती मृत्यू झाला. भडगाव-पाचोरा रोडवर दुचाकींमध्ये समोरा-समोर धडक होवून झालेल्या या अपघातात तरुणासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघे जखमी झाले आहेत.

भरधाव दुचाकी धडकल्याने अपघात
घाटनांद्रा येथील बबलू उर्फ रामेश्वर मोरे (25) हा शेतात काम करण्यासाठी सेंधवा येथून सालदार घेऊन येत असतांना पाचोरा-भडगाव दरम्यान मदरसाजवळ समोरुन येणार्‍या दुचाकींमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकी (एम.एच.20 डी.एन.5962) वरील रामेश्वर मोरे व सेंधवा येथील निलेश बारेला हा जागीच ठार झाला. अपघातात मयत रामेश्वर मोरे हा घाटनांद्रा येथील शेतकरी असून मंगळवारीच त्याला लग्नासाठी बघायला मुलीकडील मंडळी आली होती. लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच रामेश्वरचा अपघाती मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अपघाताची वार्ता कळताच मयताच्या गोंदेगाव परीसरातील नातेवाईकांनी पाचोरा कॉग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांना ही बातमी कळवल्यानंतर सोमवंशी यांनी तत्काळ भडगाव येथील टायगर ग्रुपचे सद्दाम शेख, जुबेरा मिर्झा, अमीर शेख, बबलू पवार यांना मदत कार्यासाठी पाठवले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !