चाळीसगावात न्यायालयाच्या आवारातून दुचाकी लंपास
चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील न्यायालयाच्या आवारात उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
चाळीसगावातील मुंदखेडा येथील पोपटराव विठ्ठलराव वाबळे (55) यांनी दुचाकी (क्र. एम.एच.19 सीबी 7555) शहरातील न्यायालयाच्या आवारात उभी केलेली असताना अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना सोमवार, 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.15 ते 12 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पोपटराव यांनी परीसरात शोधाशोध केली असता 30 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची मोटारसायकल मिळून आल्याने अज्ञात इसमाने ती चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर पोपटराव यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुभाष घोडेस्वार करीत आहेत.





