किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण : तिघांविरोधात गुन्हा


चाळीसगाव : गुरांसाठी ऊसाची बांडी मागीतल्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वाघडू येथे घडली. याप्रकरणी पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील अक्षय रमेश पाटील (16 ) या तरूणाने ऊसाची बांडी विक्री करणार्‍या इसमांकडून गुरांसाठी बांडी मागितली. याचाच राग येऊन प्रकाश चिंतामण पाटील, महेंद्र प्रकाश पाटील व भुषण प्रकाश पाटील (सर्व रा.वाघडू, ता.चाळीसगाव) आदींनी संगनमताने अक्षय पाटील याला जबर मारहाण केली. दरम्यान, महेंद्र प्रकाश पाटील यांनी लाकडी दांडका असलेल्या फावडीने उजव्या कानाजवळ व कमरेच्या उजव्या बाजूला मारहाण केली तसेच भूषण प्रकाश पाटील यांनी जमिनीवरील दगड उचलून पाठीवर व कमरेवर मारहाण केली. यात अक्षयला गंभीर दुखापत झाली. ही घटना शुक्रवार, 26 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षय पाटील याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादंवि कलम 324, 323, 504, 506 व 34 प्रमाणे वरील तिन्ही संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक भगवान उमाळे करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !