जळगावात 62 लाखांची फसवणूक : दिल्लीतील तिसरा ठग सायबर पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : विमा कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याची थाप मारून दोघांनी टिकाराम शंकर भोळे (88, रा. विद्युत कॉलनी) यांना 61 लाख 79 हजार 593 रुपयांचा गंडा घातला. 25 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी यातील अमितसिंग देवेंद्र प्रकाश सिंग उर्फ अमित शर्मा पिता मुलचंद शर्मा (रा. मोतीराम रोड, मानसरोवर पार्क, शाहदरा नॉर्थ इस्ट दिल्ली) व लखमीचंद राजेश कुमार (जोहरीपूर, दिल्ली) यांना 24 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर सोमवारी दीपेश कुमार पिता तारकेश्वर सिंग (27, रा. उत्तमनगर, दिल्ली) यालाही अटक करण्यात आली. संशयितांकडून आत्तापर्यंत पाच लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. तिघांना न्यायालयाने 3 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
