हिरापूरजवळ भरधाव क्रुझर उलटली : तिघे मजूर जागीच ठार
चाळीसगाव : भरधाव क्रुझर (cruiser) वाहन उलटून झालेल्या अपघातात तीन मजूर जागीच ठार झाल्याची घटना बुधवार, 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास हिरापूर गावाजवळील महादेव मंदिराजवळ घडली. पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील हे मजूर असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. नाना भास्कर कोळी, विकास जलाल तडवी व मुक्तार तडवी अशी मयतांची नावे आहेत. दरम्यान, मयत मजूर मनमाड येथील एफसीआय गोदामात कामास असल्याचीही माहिती घटनास्थळावरून मिळाली.
वाहन अनियंत्रित झाल्याने अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार, मनमाड येथून पाचोरा शहराकडे भरधाव वेगाने निघालेली क्रुझर (एम.एच.14 ए सी.5604) (cruiser) ही चालकाचे नियंत्रण सुटल्याने हिरापूर गावापासून काही अंतरावर असलेल्या महादेव मंदिराजवळ उलटली. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात जागीच तीन मजुरांचा मृत्यू झाला तीन जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या क्रूजरमध्ये एकूण 14 प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती असून अन्य आठ प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याने त्यांच्यावरही चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. अपघातात मयत झालेल्या मजुरांचे मृतदेह (death body) चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला वेग दिला.





यांचा झाला मृत्यू
या अपघातात नाना भास्कर कोळी, विकास जलाल तडवी व मुक्तार तडवी यांचा मृत्यू झाला तर विनोद तडवी (३५), चंदन हरीश पाटील (२७), समाधान नारायण पाटील (३०) हे गंभीर जख्मी झाले आहेत. त्याशिवाय
नितीन बाळू पाटील (२६), दिलीप शबिर तडवी (३५), समीर राजू तडवी (२३) यांच्यासह अन्य प्रवासी जखमी (jakhmi) झाले आहेत.
