वृद्धाकडील पिशवीला ब्लेड मारत एक लाखांची रोकड लंपास : जळगावातील घटना


जळगाव : जळगाव पोस्ट ऑफीस कार्यालयात आलेल्या वृध्दाची पिशवी कापून एक लाख रुपयांची रोकड लांबवण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिशवीला ब्लेड मारत लांबवली रोकड
मजूरी काम करणारे रामेश्वर कॉलनीत राहणारे देवराम बाबुराव चौधरी (वय-72) हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्यांचे जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते काढले आहे. पोस्टाच्या खात्यात त्यांनी दीड लाख रूपयांची बचत केली होती. दरम्यान पोस्टात त्यांना व्याज कमी मिळत असल्याने त्यांनी पैसे काढून इतर बँकेत टाकण्याच्या विचारात असल्याने गुरुवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नातवासोबत जळगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात आले. यावेळी नातवाने भरणा स्लीप भरली आणि आजोबांनी पोस्टाच्या खात्यातून 1 लाख रूपये काढले.पैसे काढल्यानंतर पोस्टाच्या रोखपाल यांना पैश्यांचे बंडल मशिनमध्ये मोजून दाखवा असे सांगितले. त्यावर पैसे मोजण्याचे मशीन बंद असल्याचे सांगितले. त्यानुसार देवराम चौधरी यांनी पोस्ट कार्यालयातच बसून 20 मिनीटे पैसे मोजत बसले होते. पैसे मोजून झाल्यानंतर त्यांनी पैसे सोबतच्या पिशवीत ठेवले आणि ते इतर बँकेत जाण्यासाठी निघाले. अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवी कापून पिशवीतील एक लाख रूपयांची रोकड लांबविले.






पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
एक लाखांची रोकड लांबवण्यात आल्याची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला वेग दिला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !