जळगावात कोरोना नियमांना बगल : दहा दुकानदारांना महापालिकेकडून दंडाच्या नोटीसा
जळगाव : जळगाव शहरात कोरोना नियमांचे उल्लंघण करणार्या 10 दुकानदारांवर गुरूवार, 2 डिसेंबर रोजी दुपारी दंडात्मक कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्याने व्यापार्यांच्या गोटात खळबळ उडाली. 24 तासांच्या आत लेखी खुलासा न दिल्यास दंड आकारण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी यांनी दिला आहे.
कोरोना नियमांना बगल
दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांनी कोरोना नियमांचे अटी व शर्ती लागू करून दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानदार यांचे पालन करत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी जळगाव महापालिकेचे अतिक्रमण विभागाने उपायुक्त श्याम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार ,2 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यान तपासणी मोहीम राबविण्यात आले. या मोहिमेत मॉल, दुकाने, हॉटेल्स व इतर ठिकाणी पाहणी करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे, ग्राहक व दुकानरांनी लसीकरण न करणे आदी तपासण्यात आले. यात बळीरामपेठेतील मनोहर साडीयाँ, श्री जी. साडीयाँ, ओंकारेश्वर मंदीरा समोरील वसंत सुपर शॉप, बहिणाबाई उद्यानसमोरील नवजीवन प्लस, टॉवर चौकातील बॉम्बे सेल्स, नवीपेठेतील मनोहर शुज सेंटर, राजेश कलेक्शन, बळीराम पेठेतील नितीन फुट वेअर्स, संत कंवरराम क्लॉथ स्टोअर्स आणि आकाश एजन्सी अशा दहा दुकानदारांना एकुण 1 लाख 10 हजार रूपयांची दंडाची नोटीसा बजावण्यात आल्या. दुकानदारांनी 24 तासांच्या आत खुलासा महापालिकेत न दिल्यास आकारलेली दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी यांनी दिला आहे.





