भरधाव आयशरची दुचाकीला धडक : दुचाकीस्वार ठार तर दोघे गंभीर


धरणगाव : तालुक्यातील लोणे गावाजवळ भरधाव आयशरची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास झाला. ट्रक चालकाला नागरीकांनी चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दुचाकीस्वार जागीच ठार
धरणगाव तालुक्यातील लोणी फाटा गावाजवळून भरधाव वेगाने जाणार्‍या आयशर (एम.एच.19 झेड. 3243) ने समोरून येणार्‍या दुचाकी (एम.एच.19 डी.पी.8602) ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबतचे दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला. जखमींना तातडीन धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर मयताचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान मयताचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघात घडल्यानंतर नागरीकांनी पळून जात असलेल्या आयशर चालकाला पकडून चांगलाच चोप दिला आणि धरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !