जळगाव-शिरसोली रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक : हॉटेल वेटरचा मृत्यू


जळगाव : जळगाव-शिरसोली रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पायी जाणार्‍या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

हॉटेल वेटरचा मृत्यू
जळगाव-शिरसोली रस्त्यावर असलेल्या आर.के.ढाबा येथे भिका कडू महाजन (45, रा.टाकरखेडा, ता.यावल, जि.जळगाव) हा तरुण गेल्या काही महिन्यांपासून वेटर म्हणून कामाला होता. गुरुवार, 2 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास रस्त्यावरून तो पायी जात असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला ढाब्यावरील संताजी लाडवंजारी यांनी तातडीने खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिात ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई सुसाबाई, बहिण दुर्गाबाई असा परीवार आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक सुद्दोधन ढवळे हे करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !