बोदवड नगरपंचायत निवडणूक : तिसर्‍या दिवशी चार उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल

7 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होणार : 8 रोजी जाहीर होणार उमेदवारांची यादी


बोदवड : नगरपंचायतीची निवडणूक 21 डिसेंबर रोजी होत असून प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 7 डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार असल्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी चार उमेदवारांनी नामनिर्देशन सादर केले. प्रभाग क्रमांक पाच मधून सर्वसाधारण जागेसाठी श्री लभाने दिनेश गजानन,प्रभाग क्रमांक एकमधून सर्वसाधारण महिला जागेसाठी प्रमिला संजय वराडे, प्रभाग क्रमांक चौदामधून सर्वसाधारण जागेसाठी शेख अजिमोद्दीन शेख शरीफोद्दीन, प्रभाग क्रमांक 16 मधून सर्वसाधारण महिला जागेसाठी बेबीबाई विनोद माळी या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले.

8 डिसेंबरला उमेदवार यादी जाहीर होणार
4 व 5 डिसेंबर रोजी अनुक्रमे शनिवार व रविवारची सुटी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. आजमितीस दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी व अवैध नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी बुधवार, 8 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार, 13 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने कामकाज पाहत आहेत. तहसीलदार जितेंद्र कुवर व मुख्याधिकारी आकाश डोईफोडे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.






तहसील आवारात लावली कागदपत्रांची माहिती
सर्व उमेदवारांनी मग तो अपक्ष उमेदवार असो अथवा पक्षाचा पुरस्कृत उमेदवार असो, तीन चिन्हांची निवड करणे आवश्यक आहे तसेच इतर देखील महत्त्वाच्या सूचना व नामनिर्देशन पत्र सादर करताना आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची माहिती तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली असल्याची माहिती निवडणूक प्रशासकीय अधिकार्‍यांकडून मिळाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !