जळगावात चोरट्यांनी धूम स्टाईल तरुणाचा मोबाईल लांबवला


जळगाव : धूम स्टाईल येत तरुणाच्या हातातील चोरट्यांनी लांबवल्रूाची घटना शहरातील गणेश कॉलनी परीसरात घडली. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईल लांबवण्याच्या प्रमाणात वाढ
शहरातील गणेश कॉलनी परीसरातील यशवंत जगन्नाथ शिंपी (25, रा. श्रीहरी नगर, गणेश कॉलनी) हा आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. सोमवार, 6 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी परीसरात शतपावली करत मोबाईलवर बोलत असतांना अज्ञात दोन भामटे त्यांच्या मागून येवून यशवंतच्या हातातील पाच हजार रूपये किंमतीची मोबाईल हिसकावून धुमस्टाईल पळाले. या प्रकरणी यशवंत शिंपी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तुषार जावरे करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !