रायपूरला तरुणास मारहाण : दोघांविरोधात गुन्हा


जळगाव : तालुक्यातील रायपूर येथे दोघांनी ठेकेदाराकडून पैसे मागण्यासाठी एका तरुणास सांगितले असता त्याने नकार दिला. याचा राग येवून दोघांनी त्या तरुणास स्टीलच्या डब्याने मारहाण केल्याची घटना सोमवार, 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे मागण्यास नकार दिल्याने मारहाण
रायपूर येथे साईदास चव्हाण (36) हा तरुण वास्तव्यास आहे. सोमवारी सायंकाळी 7 वाजता साईदास यांच्याकडे घरी गावातीलच महेश अनिल राठोड, मयूर अनिल राठोड हे दोघे आले. दोघांनी साईदास यास ठेकेदारालाकडून 10 हजार रुपयाचे मागण्यासाठी फोन लावण्यास सांगितला. फोन लावण्यास नकार दिल्याने दोघांनी साईदास यास जेवणाच्या स्टीलच्या डब्याने मारहाण करीत दुखापत केली. यात साईदास जखमी झाला आहे. याप्रकरणी साईदास याच्या तक्रारीवरुन महेश राठोड, मयूर राठोड या दोघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील हे करीत आहेत.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !