दुचाकीचा कट लागल्यावरुन विद्यार्थ्यास मारहाण
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात गेलेल्या तरुणाच्या दुचाकीचा कट लागल्याने तीन ते चार जणांकडून विद्यार्थ्यास लोखंडी आसारीसह दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कट लागल्यावरून बेदम मारहाण
जळगाव तालुक्यातील कुसुंबा साई सिटी येथील विद्यार्थी कुणाल किरण कोळी (17) हा विद्यार्थी नूतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवार, 6 डिसेंबर रोजी कुणाल हा नुतन मराठा महाविद्यालयात गेला असता याठिकाणी त्याच्या दुचाकीचा भूषण माळी (रा.तुकाराम वाडी) याला कट लागला. या कारणावरुन भूषण माळी व चेतन सुशीर (जळगाव) यांनी किरणसोबत वाद घालत कुणालला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत भूषण व चेतन यांच्यासह त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोघांनी कुणालच्या डोक्यात लोखंडी सळई व दगड मारुन त्याला जखमी केले. या मारहाणीत कुणालच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी मंगळवार, 7 डिसेंबर रेाजी सांयकाळी 7 वाजता कुणाल कोळी याच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





