चाळीसगाव शहरात अल्पवयीन मुलाची आत्महत्या
चाळीसगाव : शहरातील हरगीरबाबा नगरातील अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवार, 8 रोजी दुपारी ही घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
चाळीसगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
चाळीसगाव शहरातील हरगीरबाबा नगर येथील लक्ष्मण संजय पवार (16) या अल्पवयीन मुलाने बुधवारी दुपारी अडीच वाजता गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान मयताने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.





