चाळीसगावातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबवली
चाळीसगाव : शहरातील खरजई नाक्याजवळ उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकींची चोरी होत असल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
प्रकाश फकिरा पाटील (रा.कनाशी, ता.भडगाव) यांनी शहरातील खरजई नाक्याजवळील त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्रासमोर दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सीई 3863) उभी केलेली असताना अज्ञात इसमाने ती लांबवली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास भूषण पाटील करीत आहेत.





