कर्जाच्या नावाखाली जामनेर तालुक्यातील तरुणाला साडेआठ लाखांचा ऑनलाईन गंडा


जळगाव : कर्ज प्रकरण मंजूर करून कर्ज काढून देण्याच्या नावाखाली जामनेर तालुक्यातील तरुणाला आठ लाख 34 हजाराचा ऑनलाईन गंडा घालण्याकर्जाच्या नावाखाली जामनेर तालुक्यातील तरुणाला साडेआठ लाखांचा ऑनलाईन गंडात आला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बनावट कॉलमुळे झाली फसवणूक
गजानन लक्ष्मण सोनवणे (37, रा.पळासखेडा, ता.जामनेर) हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. 27 सप्टेंबर रोजी त्यांना बजाज फायनान्स प्रतिनिधी नावाने बनावट कॉल आला. त्यांनी बजाज फायनान्सकडून पाच लाख रुपयांचे पर्सनल लोन मंजूरी करून देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ चार्जेस लावण्यात आल्याचे सांगून त्यांच्याकडून आठ लाख 34 हजार 817 रूपये ऑनलाईन पध्दतीने स्वाकारले. त्यानंतर समोरील व्यक्तीने बजाज फायनान्सचे लोन मंजूरीचे बनावट लेटर पाठवून फसवणूक केल्याचे 27 ऑक्टोबर रोजी समोर आले. याप्रकरणी गजानन सोनवणे यांनी बुधवार, 8 डिसेंबर रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !