चोपड्यात 86 हजारांच्या किराणा मालावर चोरट्यांचा डल्ला
चोपडा : शहरातील आझाद चौकातील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून 86 हजार रूपये किंमतीचा किराणा चोरून नेला. याप्रकरणी चोपडा पोलि ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
86 हजारांचा किराणा माल लंपास
राहुल विश्वास गुजराथी (38, रा.हुंडीवाली गल्ली, चोपडा, जि.जळगाव) यांचे चोपडा शहरातील आझाद चौकात राहुल प्रोव्हीजन किराणा दुकान आहे. शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता ते दुकान नेहमीप्रमाणे बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दुकानातील 86 हजार 610 रुपये किंमतीचा किराणा माल लांबवला. हा प्रकार शनिवार, 4 डिसेंबर रेाजी सकाळी 8 वाजता उघडकीला आला. याप्रकरणी राहुल गुजराथी यांच्या फिर्यादीवरून चोपडा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.





