पहुरमधील 27 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या


पहुर, ता.जामनेर : गावातील लेलेनगर भागात राहणार्‍या 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरासमोर आलेल्या निंबाल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी पहुर पोलि ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नारायण त्र्यंबक उबाळे (27, रा.लेले नगर, पहुर, ता.जामनेर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
नारायण त्र्यंबक उबाळे हा तरूण गॅरेज व्यवसायासह ट्रॅक्टर रोटावेटर चालविण्याचे काम करीत होता. बुधवारी रात्री ट्रॅक्टर रोटावेटरच्या कामासाठी दुसर्‍याच्या शेतावर गेल्यानंतर काम आटोपून रात्री 2 वाजेच्या सुमारास घरी आला. सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना नारायण उबाळे याने राच्या बाहेर येऊन दाराला बाहेरून कडी लावली आणि समोरच असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण नेमके कळू शकले नाही.






मृतदेह पाहताच कुटुंबियांचा आक्रोश
नेहमीप्रमाणे मयत नारायण उबाळे यांची वहिनी भावना उबाळे सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास उठल्या आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दाराला बाहेरून कडी लावलेली असल्याने त्यांनी दरवाजा जोरात ठोठावला. त्यांच्या या प्रयत्नात दरवाजाला बाहेरून असलेली दरवाजाची कडी उघडलीव दिराने आत्महत्या केल्याचे पाहताच त्यांना मोठा धक्का बसला व त्यांनी कुटुंबियांना आरोळ्या मारत आवाज दिला. मुलाने आत्महत्या केल्याचे दृश्य पाहून सर्व कुटुंबियांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत नारायणच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परीवार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !