धूम स्टाईल मोबाईल लांबवणारा अट्टल चोरटा जिल्हा पेठ पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : जळगाव शहरात पादचारी व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळ काढणार्‍या संशयिताला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण भाईदास कोळी (विखरण, ता.एरंडोल) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी केली अटक
शहरातील जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राखी मुळजाडे (रा.जळगाव( या रस्त्याने मोबाईलवर बोलत असतांना अज्ञात दोन भामट्यांनी मागून दुचाकीवर येवून हातातील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना 17 फेब्रुवारी 2021 रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी संदीप राजू कोळी (कुरंगी, ता.पाचोरा) याला यापुर्वी अटक केली होती. तर दुसरा पसार संशयीत प्रवीण कोळी याला जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस नाईक गणेश पाटील, नाईक सलीम तडवी, पहुरकर, योगेश साबळे यांच्या पथकाने अटक केली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या दोघांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !