जळगावात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह


जळगाव : शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील अंकल ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर एका 50 वर्षीय अनोळखी पुरूषांचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीला आला. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील अंकल ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर गुरूवार ,9 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास अंदाजे 50 वर्षीय अनोळखी पुरूष मयत स्थितीत आढळून आला. या संदर्भात प्रौढ व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. सहाय्यक फौजदार चर्‍हाटे व पोलिस कॉन्स्टेबल संतोष खवले यांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी महाजन यांच्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !