खेडगाव नंदीचे गावातील शेतकर्याची आत्महत्या : कर्जास कंटाळून उचलले पाऊल
पाचोरा : तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेतकर्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. समसुद्दीन रज्जाक पिंजारी असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
कर्जबाजारी झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
शेतकरी समसुद्दीन रज्जाक पिंजारी यांच्या स्वतःच्या शेतातील पिकाच्या माध्यमातून खर्चसुद्धा निघत नसल्याने आणि मागील दोन वर्षापासून सतत झालेल्या पावसामुळे जवळपास 70 टक्के नुकसान झाले होते. उदरनिर्वाह चालवण्यासाठी विविध ठिकाणाहून उसनवारी करून आपला उदरनिर्वाह करणार्या शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून समसुद्दीन पिंजारी यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.





पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
याप्रकरणी पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या खबरीनुसार पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल मुकूंद परदेशी करीत आहेत.
