पाचोर्‍यात बंद घरातून तीन लाखांचे दागिने लंपास


पाचोरा : शहरातील सिंधी कॉलनी परीसरात तरुाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाळत ठेवून केली चोरी
कैलास सुरेशकुमार कुकरेजा (34, रा.सिंधी कॉलनी पाचोरा), हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून बुधवार, 8 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 3.30 वाजेच्या दरम्यान कैलास कुकरेजा हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. आज्ञात चोरट्यांनी अवघ्या 20 मिनिटात घराचा कडी कोयंडा तोडून घरातील तीन लाख 8 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे लांबविले. याप्रकरणी कुकरेजा यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !