आडगावात पैशांसाठी तरुणाच्या डोक्यात घातला लाकडी तांडा : तिघांना अटक


चोपडा : तालुक्यातील आडगाव येथे पैसे घेण्याच्या कारणावरून तरूणाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून गंभीर दुखापत करण्यात आली शिवाय तरुणाच्या कुटुंबियाला मारहाण झाली. या प्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसात दाखल झाला गुन्हा
इरफान कासम तडवी (21, रा.जवाईवाडा, अडावद, ता.चोपडा) हा तरूण मजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. गावातील दीपक गोपीचंद कोळी यांच्याशी त्याचे पैश्यांची देवाण-घेवाण झाली असून बुधवार, 8 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास इरफान तडवी हा इंदिरा नगरातून जात असताना दीपक कोळी यांच्याशी पैश्यांवरून वाद झाला होता. त्यानंतर संशयीत आरोपी दीपक गोपीचंद कोळी, गोविंदा ज्ञानेश्वर कोळी आणि राहुल गोपीचंद कोळी (रा.इंदीरा नगर, अडावद, ता.चोपडा) हे इरफानच्या घरी येवून त्याच्या डोक्यात लाकडी दांडका हाणला. यामुळे तो गंभीर जखमी झाला तर इरफानच्या कुटुंबातील महिलांसह इतर सदस्यांना धमकी देवून जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर घराची भिंत, छप्पर, दरवाजे तोडून नुकसान करण्यात आली. याप्रकरणी इरफान तडवी यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !