बेरोजगारांना मोठी संधी : 12 ते 17 डिसेंबरदरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा


जळगाव : बेरोजगारांना रोजगाराची संधी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. 12 ते 17 दरम्यान होणार्‍या या राज्यस्तरीय मेळाव्यात नोकरी इच्छुक उमेदवारासाठी ही एक सुवर्णसंधी असून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व नामांकित कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील कंपन्या या मेळाव्यात वेगवेगळया प्रकारची रिक्तपदे नोंदवत आहेत.

500 रीक्तपदे भरली जाणार
सर्वसाधारणपणे 9 वी पास पासून पुढे किंवा 10 वी 12 ग्रॅज्युएट / डिप्लोमा/ एम ई / बी ई / काम्प्यूटर ऑपरेटर/ आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण 500 रीक्तपदे भरण्यात येणार आहेत. या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, तसेच अल्पसंख्याक उमेदवारांणी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या ुुु.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्य रिक्तपदांना प्लाय करण्यासाठी सेवा योजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करून प्लाय करावा तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉग-ईन करुन प्लाय करावा. काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते सध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्य आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता वि.जा.मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !