भुसावळातील दुचाकी चोरटा जळगाव तालुका पोलिसांच्या जाळ्यात

दुसरा संशयीत दुचाकीसह पसार : अटकेतील आरोपीने दिली चोरीची कबुली


जळगाव : शहरातील दादावाडी परीसरातील एकविरा हॉटेल जवळून दुचाकी चोरणार्‍या संशयीत आरोपीला तालुका पोलिसंनी अटक केली. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, शहरातील दादावाडी परिसरात गुरूवारी 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दोन जण दुचाकीवर संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्‍यांना मिळाली. सोहेल युसूफ अली (19, रा.रजा टॉवर, जाम मोहल्ला, इराणी गल्ली, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. दरम्यान, संशयीतासोबतचा अन्य एक दुचाकीसह पसार झाला आहे.

दुचाकी चोरीची दिली कबुली
पोलिस नाईक दिनेश पाटील, विश्वनाथ गायकवाड, भूषण सपकाळे, प्रशांत ठाकूर यांनी गोपनीय माहितीवरून कारवाई करत दुचाकीवर फिरणार्‍या संशयीत आरोपी सोहेल युसूफ अली (19, रा.रजा टॉवर, जाम मोहल्ला, ईराणी गल्ली भुसावळ) याला ताब्यात घेतले तर दुसरा संशयीत आरोपी सुलतान जावेद जाफरी उर्फ लल्ला (रा.रजा टॉवर, भुसावळ) हा त्याच्या सोबत असलेली चोरीची दुचाकी घेवून पसार झाला.






दादावाडीतील चोरीची दिली कबुली
संशयीत आरोपी सोहेल याची कसून चौकशी केली असता त्याने दादावाडी परीसरातील एकविरा मंदिराजवळून 9 सप्टेंबर रोजी दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिली आहे. सोबत पाचोरा, जामनेर आणि वरणगाव येथून प्रत्येकी दोन मोबाईलची चोरी केल्याचे कबुली दिली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी संशयीताला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !