रीक्षाची दुचाकीला धडक : जळगावात अल्पवयीन मुलगा जखमी


जळगाव : रीक्षाने दुचाकीला धडक दिल्याची घटना गुरुवार, 9 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला 17 वर्षीय मुलगा जखमी झाला. जिल्हा पेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
जळगाव शहरातील कंजरवाडा परीसरातील जाखनी नगरात आकाश अरुण दहेकर हे वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या एम.एच.19 सी.एम. 5177 या क्रमांच्या दुचाकीने बुधवारी स्वातंत्र्य चौकातून आकाशवाणी चौकाकडे जात होते यावेळी दुचाकीवर मागे दहेकर यांचा मुलगा प्रेम बसलेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहेकर यांच्या दुचाकीला मागून प्रवासी वाहतूक करणार्‍या रीक्षाने धडक दिली. या घटनेत दुचाकीवर मागे बसलेला प्रेम याच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून दुचाकीचे नुकसान झाले तर अपघातानंतर रीक्षा चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता. याप्रकरणी आकाश दहेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात (एम.एच.19 व्ही. 7726) या क्रमांकाच्या रीक्षावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक जयंत कुमावत हे करीत आहेत.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !