जळगाव विधी सेवा प्राधिकरणाकडून वर्धमान धाडीवाल सन्मानीत
जळगाव : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान आयोजित कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रमात सहभाग घेऊन योगदान दिल्याबद्दल जळगाव विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्राप्त झालेले सन्मानपत्र देऊन चाळीसगाव शहरातील विविध चार व्यक्तींना सन्मानीत करण्यात आले. त्यात वर्धमान धाडीवाल यांना शनिवारी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा वरीष्ठ स्तर दिवाणी न्या.एन.के.वाळके यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानीत केले. याच कार्यक्रमांतर्गत यीघ्र कवी रमेश पोद्दार, बासरीवादक प्रकाश चौधरी व देवेश पवार यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी न्या.शेख, न्या.भागवत, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.प्रमोद एरंडे, सचिव अॅड.कविता जाधव तसेच वकील संघाचे सदस्य व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक कार्यातील या सन्मानाने वर्धमान धाडीवाल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
