जळगावात विजेचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू


जळगाव : शहरातील वाल्मीक नगरात राहणार्‍या विवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अश्विनी रोहित सपकाळे (22) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

हिटर शॉक लागल्याने मृत्यू
शहरातील वाल्मिक नगरात अश्विनी सपकाळे या विवाहिता पती रोहित कैलास सपकाळे यांच्यासह सासू, सासरे, दीर यांच्यासह वास्तव्यास होत्या. रविवार, 12 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पती रोहित आणि सासू हे दोघे नातेवाईकांना भेटण्यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. त्यावेळी विवाहिता घरी एकट्याच होत्या. त्यांनी पाणी तापवण्यासाठी हिटर लावले असता त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला, त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान विवाहितेच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करीत मोठा आक्रोश केला. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !