जळगावात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या


जळगाव : शहरातील समता नगरातील तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुधीर नाना साळुंखे (33, रा.समता नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर साळुंखे हा तरुण आई, वडील, पत्नी व भाऊ सोबत समता नगरात वास्तव्यास होता. तत्पूर्वी तो सुरत येथे कामाला होता मात्र कोरोनामुळे कामाकाज बंद झाल्यानंतर तो पत्नीसह जळगावी आला व सध्या ते नोकरीच्या शोधात असताना शनिवार, 11 डिसेंबर रोजी रात्री कुटुंबियांसह जेवण करून सर्वजण झोपले असताना सुधीर साळुंखे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल चौधरी करीत आहे. मयत सुधीर यांच्या पश्चात आई मालूबाई, वडील नाना साळुंखे, भाऊ मुकेश, पत्नी मोनाली, मुलगी पुर्वा आणि दीड वर्षाचा मुलगा असा परीवार आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !