सेवा समाप्ती निर्णयाचे जळगाव आगारातील 20 एसटी कर्मचार्‍यांनी फुलांच्या वर्षावाने केले स्वागत !


जळगाव : एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी महिनाभरापेक्षा अधिक काळापासून संप सुरू आहे. संपकरी एसटी कर्मचार्‍यांना शेवटचा अल्टिमेटन देवूनही माघार न घेतलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या 20 कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती करण्याचे आदेश आगार प्रमुख भगवान जगनोर यांनी काढल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सेवा समाप्ती झाल्यावर देखील दु:ख न मानता सेवा समाप्ती निर्णयाचे एसटी कर्मचार्‍यांनी स्वत:च्या अंगावर फुलांचा वर्षाव करत शासनाने दिलेल्या शेवटच्या अल्टिमेटमच अनोखे आंदोलन करत स्वागत केले आहे. यात 12 चालक, 7 वाहक आणि 1 सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे.

कारवाईचे आम्ही स्वागतच करणार !
यावेळी एसटी कर्मचारी यांनी सांगितले की, मेस्माची कारवाई असो की निलंबनाची कारवाई आम्ही कारवाईला घाबरत नाही. शासनाने कारवाई करत राहावे, आम्ही या कारवाईचा फुलांप्रमाणे स्वीकार करू असे, म्हणत जळगाव आगारातील कर्मचार्‍यांनी स्वत च्या हाताने स्वत: च्या अंगावर फुलांचा वर्षाव करत अनोख्या पध्दतीने कारवाईचा निषेध व्यक्त केलाय मात्र आंदोलनावर आम्ही शेवटपर्यंत ठाम असल्याचंही प्रशासनाला दाखवून दिले.






संपकरी मागण्यांवर ठाम
शासनाने बस कर्मचार्‍यांना सेवेत हजर होण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे. यापूर्वीही अनेक कारवाईचे आदेश आले. मात्र त्यानंतरही कर्मचारी संपावर तसेच त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. आज जळगाव आगारात संपकरी बस कर्मचार्‍यांनी स्वत:च्या हाताने स्वत :वर फुलांचा वर्षाव करत अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. शासनाने कितीही कारवाई केली. तरीही आम्ही त्याला घाबरत नाही आणि जोपर्यंत एसटी विभागाच्या शासनात विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत मागण्यांवर तसेच आंदोलनावर ठाम असल्याचंही कर्मचार्यांनी सांगितले

शासनाकडून 20 कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती
आधार गोमा नन्नवरे, रजनिकांत लोटू साळुंखे, गोकुळे धुडकू नन्नवरे, शंकर सुकदेव सोनवणे, लक्ष्मण तुळशीराम कोळी, लक्ष्मण रामदास नन्नवरे, मोतीलाल पांडूरंग नन्नवरे, झेंडू रामा सोनवणे, राजेंद्र दामोदरे सपकाळे, रवीकिरण पिंताबर सुर्यवंशी, युवराज राजाराम पाटील, शरद तुळशीराम सोनवणे, सुधाकर गंगाराम सोनवणे, ज्ञानेश्वर यशवंत सोनवणे, ज्ञानेश्वर भगवान सोनवणे , सुनिल तानकू पाटील, गोविंद सुकलाल ठाकरे, अशोक आत्माराम सोनवणे, प्रकाश रामचंद्र सोनवणे, वसंत बुधा पाटील या 20 कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !