बोलेरो-दुचाकीत अपघात ; दोघे जागीच ठार : चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव : शहरापासून जवळच असलेल्या बिलाखेडजवळ बोलेरो व बुलेट एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जखमी झाला. हा अपघात सोमवार, 13 रोजी सायंकाळी घडला. अपघातानंतर बोलेरो चालक पसार झाला आहे.
बोलेरो-दुचाकीत अपघात
चाळीसगाव शहरालगत असलेल्या बिलाखेडजवळ बोलेरो व बुलेट समोरासमोर एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. ही अपघात सोमवारी सायंकाळी सात वाजता घडला. या अपघातात प्रकाश एकनाथ बाविस्कर (24) व विजय दगडू मोरे (25) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर आदित्य श्रावण शहादेव (रा.आडगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच बोलेरोवरील चालक हा पसार झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले.





