महिला पर्यटकाची हत्या : आरोपीने महिलेचे शीरही कापून नेले
माथेरान : एका महिला पर्यटकाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. इंदिरा नगर परीसरात ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे या महिलेचे शिर हत्या करणार्याने कापून नेले.
निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला
माथेरानमधील इंदिरानगर परिसरात शनिवारी एक जोडपे सायंकाळी राहण्यासाठी आले होते. लॉजच्या मालकाने त्यांची नावे नोंदवून खोली भाड्याने दिली होती. रविवारी सकाळी जेव्हा या पर्यटकांना पाहण्यासाठी गेले असता महिलेचे धड पलंगाखाली निर्वस्त्र अवस्थेत आढळून आले. मृत महिलेचे आरोपीने शिर सोबत घेऊन गेल्याने तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांसमोर अनेक अडचणी येत आहेत. लॉजच्या नोंदवहीत महिलेचे रुबीना बेन व सोबत असलेल्या व्यक्तीचे अमजद खान अशी खोटी माहिती भरली असल्याचे उघड झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.





