गंगेत वाहणारे मृतदेह तुम्हाला मत देणार का ? : सेनेचे खासदार संजय राऊत
गोवा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका करताना योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला. जिवंत लोक भाजपला मतदान करणार नाहीत. गंगेत वाहणारे मृतदेह भाजपला मतदान (Bjp Voting) करणार आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) मागील दोन दिवसांपासून गोव्यात होते.
भाजपने पर्रीकरांना तिकिट द्यायला हवे
गोव्यात शिवसेनेचा महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचा मानस आहे. गोव्याच्या दौर्यानंतर संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला म्हणजेच उत्पल पर्रीकरांना तिकिट देण्याची मागणी केली. भाजपने पर्रीकरांना तिकिट दिले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांची काय लायकी आहे, पर्रीकरांसमोर असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.




सर्वांना सोबत घेवून लढाव्यात निवडणुका
अखिलेश (Akhikesh Yadhav) यांनीही सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढल्या पाहिजे. लोकांना अखिलेश यादव यांच्याकडून अपेक्षा आहेत, असं राऊत म्हणाले. सध्या भाजपाचे लोक दलित कुटुंबीयांच्या घरोघरी जाऊन ध्रुवीकरण करत आहेत. भाजपचं हे वोट बँकेचं राकारण आहे. माणसं म्हणून सगळ्यांना वागणूक द्या, असं ते म्हणाले.