पिताच निघाला हैवान : 20 वर्षीय विवाहित मुलीवर बलात्कार
श्योपूर : बाप-लेकीच्या नात्याला पित्यानेच काळीमा फासल्याने या घटनेविषयी सर्व स्तरावरून संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील विजयपूरमध्ये हैवान पित्याने आपल्याच 20 वर्षीय विवाहित मुलीला वासनेचा बळी बनवून बलात्कार केला. या घटनेनंतर आईसोबत पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या मुलीने वडिलांवर बलात्काराचा आरोप केला आहे.
आरोपी वडिलांविरोधात तक्रार
विजयपूर पोलिस ठाण्याच्या गोपालपुरा गावातील आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या आईसह विजयपूर पोलीस ठाणे गाठून आरोपी वडिलांविरोधात तक्रार दाखल केली तर बलात्कार पीडितेच्या तक्रारीवरून विजयपूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी वडिलाला अटक करण्यात आली आहे.




20 वर्षांच्या विवाहित मुलीवर बलात्कार
विजयपूरच्या गोपालपुरा गावात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी पीडित मुलगी तिच्या माहेरी आली होती आणि ती तिच्या वडिलांच्या घरी होती. तर पीडितेची आई तिच्या माहेरी गेली होती. पीडित मुलगी आपल्या बहिणी आणि भावांसह घरात राहत होती आणि रात्री उशिरा तिच्या वडिलांच्या डोक्यात क्रौर्याची भुत शिरले आणि सैतान बनलेल्या बापाने तिच्या 20 वर्षांच्या विवाहित मुलीवर बलात्कार केला.